Ad will apear here
Next
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी
गिरीश खेडकर यांचे प्रतिपादन; विज्ञान परिषद व ‘दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स’तर्फे व्याख्यान


पुणे :
‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान घेणे खूप गरजेचे आहे. अभियंत्यांसाठी विविध पदांकरिता सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु माहितीअभावी अभियंते या क्षेत्राकडे वळत नाहीत. केवळ खासगी नोकऱ्या करण्यापेक्षा प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय सेवेत आलात, तर देशासाठी काम करण्याची संधी, सर्व सोयी, योग्य वेतन आणि उच्च पदापर्यंत जाण्याची संधी मिळू शकते,’ असे मत ‘इन्फिनिटी अकॅडमी’चे संचालक गिरीश खेडकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग आणि दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभियंत्यांना प्रशासकीय सेवेत उपलब्ध संधी’ या विषयावरील व्याख्यानात खेडकर यांनी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला. ‘दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स’च्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कार्यकारिणी सदस्य विनय र. र., दीपाली अकोलकर आदी उपस्थित होते.

गिरीश खेडकर म्हणाले, ‘जनतेची आणि देशाची सेवा करायची असेल, तर प्रशासकीय सेवेत यावे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर साधारण दोन ते तीन वर्षे सातत्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. सरकारी नियतकालिके, वर्तमानपत्र, ऑनलाइन पोर्टल या माध्यमातून परीक्षांची माहिती करून घ्यावी. अभियांत्रिकी क्षेत्रासाठी विविध संधी आहेत; पण त्या मिळवायच्या कशा याची माहिती नाही. अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा उपयोग प्रशासकीय सेवेसाठी करावा. तसेच पुस्तकी अभ्यासासोबत प्रात्यक्षिक, व्यावहारिक ज्ञान, सामान्य ज्ञान, कायदा यांचा अभ्यास करावा. शाळा महाविद्यालयांनीही स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती द्यावी. सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, त्यांनी त्या ओळखून प्रयत्न करावेत. त्यांनी त्यांची स्वप्ने आणि ध्येये मोठी ठेवावी आणि ती मिळवण्यासाठी उत्तमरीत्या काम करावे.’

राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, ‘प्रशासकीय सेवेत गेलेले अनेक अधिकारी अभियंते आहेत. रेल्वे, मरिन इंजिनीअर, एनव्हायर्न्मेंटल इंजिनीअर, स्वच्छ भारत मिशन, विमान विभाग, बँक, म्युनिसिपल कौन्सिल आदी विविध सेवांसाठी अभियंत्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच विविध सरकारी योजना राबविण्यासाठीदेखील चांगल्या अभियंत्यांची गरज आहे. त्या विद्यार्थ्यांनी माहिती करून प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत.’

दीपाली अकोलकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZMACI
Similar Posts
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदितांना नोकऱ्यांसंदर्भात मार्गदर्शन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत वेबिनार पुणे : करोनाच्या साथीमुळे उद्धवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. पदवी घेऊन करिअर सुरू करण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना, नवी नोकरी कशी शोधायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
करोनानंतरच्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थिकेंद्री बनेल : डॉ. अभय जेरे पुणे : ‘करोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थिकेंद्री होईल. प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्रकुशल विद्यार्थी देशाला हवे असून, त्याकडे लक्ष द्यावे लागेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले
‘आकांक्षा’ फुलवणारी ‘बालरंगभूमी’ पुण्यातल्या ‘आकांक्षा बालरंगभूमी’ या संस्थेत मुलांना हसत-खेळत नाट्यप्रशिक्षण दिलं जातं. मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. मुख्य म्हणजे हे सगळं करताना मुलांना कलेचा आनंद मिळवून देण्यालाच प्राधान्य दिलं जातं. अशा या वैशिष्ट्यपूर्ण ‘आकांक्षा बालरंगभूमी’चे संस्थापक सागर लोधी यांच्याशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language